19 Nov / 12:28 PM
लाकडी घाण्यावर शुद्ध खाद्यतेलांची निर्मिती:
नागपूर येथील तेजस शर्मा या मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये पदवीधर युवकानी घाटरोड विभागात आदर्श नॅचरल या नावाने लाकडी घाण्यावरील खाद्यतेल निर्मिती सुरू केली आहे. सुमारे सहा प्रकारच्या तेलांची निर्मिती ते करतात.
तेजस शर्मा यांचे आजोबा रामनाथ शर्मा यांनी १९६७ मध्ये आदर्श इंजीनियरिंग वर्क्स या नावाने शेती प्रक्रिया उद्योगाच्या संबंधित यंत्र तयार करण्याचा उपक्रम चालू केला होता. नंतर त्यांच्या वडिलांनी (श्री प्रवीण शर्मा) हा वारसा जपत शेती प्रक्रिया उद्योग यंत्रामध्ये नाव लौकिक मिळविले. सध्या ते स्वयंचलित लाकडी घाणी मशीन , उसाचा रस काढण्याचे यंत्र, गुळ निर्मिती यंत्र, सेंद्रिय खत, कोळसा, धान्य प्रक्रिया यंत्राची निर्मिती ते करतात. त्यात आदर्श लाकडी घाणी मशीन ची मागणी संपूर्ण भारतातून फार आहे कारण सध्याच्या काळात आयुर्वेदिक, सेंद्रिय, नैसर्गिक अशा शब्दांचे महत्त्व वाढू लागले आहे ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाल्यानेच तो अशा उत्पादनांची मागणी करू लागला आहे. काळाची हीच गरज ओळखून तेजस शर्मा यांनी आपल्या पारंपारिक व्यवसायाला थोडी बगल देत लाकडी घाणी खाद्यतेलांची निर्मिती चा व्यवसाय २०१८ ला सुरू केला कारण खाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे . हा पायाच जर अधिक शुद्ध, सात्विक व नैसर्गिक असेल तर तयार होणारे पदार्थ ही त्याच गुणवत्तेचे असतात पण हे करायचे कुणी ?आपणच का सुरू करू नये?अशी संकल्पना मनाशी बाळगून तेजस खाद्यतेल निर्मितीत उतरला.
आणि उद्योग उभा झाला :--
तेजस मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर झाल्याबरोबर खाद्य तेल निर्मिती उद्योगामध्ये नावलौकिक मिळावे, गरजू लोकांसाठी रोजगार निर्मिती व्हावी हे ध्येय ठेवून वडिलांसोबत चर्चा केली. वडिलांचा लाकडी घाणी यंत्र बनवण्याच्या उद्योग असल्यामुळे तेल घाणी उत्पादन प्रशिक्षण वडिलांनीच दिलं. सुमारे दोन महिने तेलबिया, तेल, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. प्रयोगशाळेतील आवश्यक चाचण्या शिकून घेतल्या. उद्योगाला सोयीस्कर अशी जागा त्यांना नागपूर येथे घाट रोड विभागात मिळाली. लाकडी घाण्याचे यंत्र द आदर्श इंजिनिअरिंग वर्क्स कडून तयार करून घेतले. सुमारे सहाशे चौरस फिट जागेत उत्पादन सुरू झाले.
विक्री व्यवस्था :--
सध्या बहुतांशी ग्राहक बाजारातील रिफाईड तेलाचाच वापर करतात. घाणीचे तेल ही जुनी मात्र आरोग्यासाठी चांगली पद्धत काळानुरूप लुप्त होत आहे, त्याला तेजस पुनर्जीवित करीत आहे. सध्या आपले ओळखीचे लोक, नातेवाईक, हितचिंतक व सोशल मीडियाद्वारे त्या तेलाचे मार्केटिंग करीत आहेत. व्यवसायाला अलीकडेच सुरुवात केली आहे, त्याला 'स्टार्ट अप' म्हणता येईल. तेल निर्मिती लाकडी गाणी द्वारे होत आहे. एक यंत्र दहा तासांमध्ये ४० लिटर तेल निर्मित करते. अश्याप्रकारे दहा तासाला चार घाणी द्वारे १६० लिटर तेल निर्मित होऊन विकल्या जाते. महिन्याला ४५००ते ५००० हजार लिटर तेल विक्री होते.
बाय प्रॉडक्ट चे पैसे :--
तेल निर्मितीत ढेप चे ही (पेंडी) उपउत्पादन मिळते. ही ढेप जनावरांना विशेषतः दुभत्या जनावरांसाठी अतिशय पौष्टिक आहार आहे. अशा ढेप मध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने अर्थातच प्रथिने जास्त मिळाल्यामुळे गाई, म्हशी जास्त दूध देतात. त्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारक शक्ती, रोगराई कमी होते. सध्या ढेपची विक्री नागपूर परिसरातील शेतकऱ्यांना केली जाते.
अशी होते तेल निर्मिती :
या पद्धतीत उच्च प्रतीच्या तेलबिया काळजीपूर्वक निवडून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात त्या लाकडी घाण्यावर दळल्या जातात. या तेलावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही, असे तेल उत्तम गुणवत्तेचे असते असे तेजस सांगतो. या प्रक्रियेत अग्नीचा वापर केला जात नाही. 'कोल्ड प्रेस' पद्धतीने त्याचे उत्पादन होते. अन्य प्रक्रियायुक्त तेल अनेक वेळा उष्ण होण्याच्या प्रक्रियेतून गेलेले असते. काहीवेळा त्यापासून ॲसिडीटी होण्याची शक्यता असते, तसे या तेला बाबत होत नसल्याचे तेजस सांगतो.
सहा प्रकारच्या तेलाचे उत्पादन :-
कच्चामालात मालात शेंगदाणा, जवस, मोहरी, खोबरे, तीळ, एरंडेल नागपूर येथून खरेदी केल्या जाते. एकाच वेळी पुरेसा माल खरेदी केला तर दरांमध्ये परवडते. आदर्श नॅच्युरलस या ब्रांडने सहा प्रकारच्या तेलाचे उत्पादन होते, तेजस यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक तेलाचा विशिष्ट गुण आहे, त्यानुसार ते आपले आरोग्य निरोगी व शुद्ध ठेवायला मदत करतात. नारळाचे तेल स्फूर्ती, उत्साहा साठी, मोहरीचे तेल रोग प्रतिकार शक्ति साठी, तिळाचे तेल रक्तभिसरणासाठी तर शेंगदाण्याचे तेल रक्तपेशींच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
कच्च्या मालापासून तेलाचा उतारा :--
एका घाणीमागे सरासरी ४० ते ४५ किलो (मालाच्या प्रकारावर अवलंबून) दहा तास प्रतिदिन १२५ ते १५० किलो कच्च्या मालाची गरज असते व १०० किलो ढेप (पेंडी) बाय प्रोडक्टच उत्पन्न होते. महिन्याला सुमारे २५ दिवस तेल घाणी चालते.
तेजस चार लाकडी तेल घाणी द्वारे तेल उत्पादन करतो. दहा तास प्रतिदिन प्रमाणे १६० ते १८०किलो तेल आणि ४०० ते ४५० किलो ढेप उत्पादन करतो. दररोज ५०० ते ६०० कच्च्या मालाची गरज असते.
महिन्याला एका घाणीमागे 30000 प्रति महिना नफा तेजसला मिळतो म्हणजेच चार घाणी द्वारे 120000 निव्वळ नफा संपूर्ण खर्च जाता मिळतो.
दर रुपये (प्रति लिटरचे) :
शेतकरी स्वतः कच्चा माल उत्पादित करतात. त्यामुळे तेल निर्मिती करणे यांना कमी खर्चिक राहील. घाण्यावर तयार केलेल्या खाद्यतेलांना बाजारात चांगली मागणी आहे. एका घाणी ची किंमत 175000 रुपये आहे आणि ३०० चौ.फिट जागेमध्ये हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. शेतकऱ्यांनी बाजारपेठ व ग्राहकांचा अधिक अभ्यास केला तर त्यांना हा उद्योग फायदेशीर आहे. उत्कृष्ट दर्जाचे लाकडी घाणी यंत्र आदर्श इंजिनिअरिंग वर्क्स, घाट रोड नागपूर येथे मिळते. अधिक माहिती करता www.adarshmachines.com या संकेत स्थळाला भेट द्या.
तेजस शर्मा : +919372725250, +919423142577
Source:https://www.adarshmachines.com/adarsh-naturals.html,| Published: 19 Nov , 2019
Tags